पु. ल.
पु. ल. पु.
ल.
लिखाण तुम्ही कित्ती
केले हो
विशेष, पुष्कळ, लक्षणीय
म्हणजेच विपुल
पु. ल.
म्हणजेच प्रतिभा विपुल
'असा मी
असा मी' असो
की;
'एक शून्य
मी' असो की;
'एक झुंज
वा-याशी' असो
की;
'बटाट्याची चाळ' असो,
'पूर्वरंग' तुमचा वाचता
वाचता
आयुष्याला उत्त्तर रंग
चढत गेला
सगळं साहित्य
तुमचं आवडत गेलं
वाचलं तेही जे
राहिलं होतं 'उरलं सुरलं'
पु. ल.
म्हणजेच प्रतिभा विपुल
'व्यक्ती आणि वल्ली'
तुम्हीच लिहावं
'हसवणूक' करता करता
प्रेक्षकांची
विनोदाच्या 'खिल्ली' ला
तुम्हीच उडवावं
'गाठोडं' हे मराठी
साहित्याचं
'मैत्र' जपलं तुम्ही
प्रत्येकाचं
'नस्ती उठाठेव' करुन
तुम्हीच न्यावं
नाव तुमचं
'पु. ल. देशपांडे'
मराठी माणसाच्या मनांत
बिंबलं
पु. ल.
म्हणजेच प्रतिभा विपुल
'व्यंग चित्रे' रंगविली
विनोदाची
'वयम् मोठ्म्
खोट्म्' वाचून
खसखस पिकविली
हास्याची
'ती फुलराणी'
वाचता वाचता
वाटून गेले 'सुंदर
मी होणार'
'जावे त्यांच्या
देशा' म्हणत
प्रवासही तुम्ही खूप
केला
तेथील वल्लींचाही प्रभाव
वर्णनात तुमच्या दिसला
'आपुलकी' लिहिता लिहिता
तुम्ही
रसिक मनांशी
आपुलकीचं नातं जोडलं
पु. ल.
म्हणजेच प्रतिभा विपुल
तुमच्या विनोदाची 'अघळपघळ'
'खोगीरभरती'
आनंद देऊन
गेली सर्वांना
निखळ हास्याची
'अपूर्वाई'
'पुरचुंडी' बांधता आज
मनांत
तुमच्या एक से
एक साहित्याची
मन तल्लीन
होऊन जाते; म्हणते
वारंवार 'जीवन त्यांना
कळले हो'
'गुण गाईन
आवडी' म्हणून आज
मन मनांतच
गुणगूणू लागलं
पु. ल.
म्हणजेच प्रतिभा विपुल
'तुझे आहे
तुजपाशी' असो;
व्यक्तिचित्रण असो की;
असो प्रवासवर्णन;
की असो,
कथाकथन, की असो,
नाट्य, गायन
'गोळाबेरीज' करता करता
साहित्यसेवेची तुमच्या
भरुन राहिलं
आज हृदयात
'पु. ल.-
एक साठवण'
विसरु शकणार नाही
कुणीच, कधीच
तुमच्या अष्टपैलू व्यक्तित्वाची
कमाल
काय एक
काळ गाजविला तुम्ही
धम्माल
पु. ल.
म्हणजेच प्रतिभा विपुल
पु. ल.
पु. ल. पु.
ल.
लिखाण तुम्ही कित्ती
केले हो
विशेष, पुष्कळ, लक्षणीय
म्हणजेच विपुल
पु. ल.
म्हणजेच प्रतिभा विपुल
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
८ नोव्हेंबर
२०१६.
No comments:
Post a Comment