रोजच जाता
येता दिसतो रस्ता
गल्ली, बोळातून वाट
काढत
रस्त्याला रस्ता मिळत
जातो
मार्गाला मार्ग सापडत
जातो
रस्त्याविना नसतो कुणालाच
पर्याय
मंजिल मिळत नाही,
हवी ती वाट
गवसत नाही
रस्त्याशिवाय
अनेक सण
उत्सवांचा साक्षी रस्ता
माणसांच्या मेळाव्यांचा धनी
रस्ता
घातपात, अपघातांची खूण
रस्ता
लग्नकार्यात ढोल, ताशांचा
गजर रस्ता
रस्ता, रस्ता, रस्ता,
आणिक रस्ता
आयुष्याचाही असतोच एक
रस्ता
अनेक चढउतारांनी,
अनेक खाचखळग्यांनी,
अनेक दुःख
आणि वेदनांनी
खात असतो
नेहमी खस्ता
रस्त्याला सवय असते
माणसांची
गजबजाटाची, बजबजपुरीची
माणसांशिवाय शोभा न
रस्ता
माणसांविना
भयाण असतो तो
पुरता
रोजचा रस्ता असतो
सवंगडी, सोबती
कर्म, कर्तव्यतत्परतेचा मार्ग
सांगाती
आयुष्य अखेरीलाही
अखेरच्या प्रवासालाही
असतोच की हो
रस्ता
अंतिम ध्येयाला जाईपर्यन्त
वाटेला वाट दाखवित
मार्गाला मार्ग मिळेपर्यन्त
शेवटच्या श्वासापर्यन्त
साथीला असतो रस्ता
मनाच्या कल्पनांमध्येही असतोच
रस्ता
कुणाला सापडे कलेचा
रस्ता
कुणाला सापडे चित्रांतून
रस्ता
कुणाला सापडे कविता
कुणाला सापडे गायन
रस्ता
कुणाला मिळे संगीत
रस्ता
कुणाला मिळे साधनेचा
रस्ता
सापडला ज्यांना ज्यांना,
अशा... कलागुणांचा रस्ता
असते आयुष्यच
त्यांच्यासाठी....
परमानंद नुसता!! परमानंद
नुसता!!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
३ नोव्हेंबर
२०१६.
No comments:
Post a Comment