Thursday, 17 November 2016

बदलावं लागतं काळासोबत

     बदलावं लागतं काळासोबत
     वावरावं लागतं जगासोबत
     चालावं लागतं गतीसोबत
    नवनवीन येणा-या लाटांसोबत

      झगडावं लागतं ध्येयासोबत
     जुळवावं लागतं संकटांसोबत
      फुलावं लागतं फुलांसोबत
     राहावं लागतं हसत हसत
     जीवघेण्या काट्यांसोबत

     जिद्दीने उभं राहावं लागतं
     जीव तोडून इराद्यांसोबत
     वाहत राहावं लागतं
    पाण्याच्या प्रवाहासोबत

     धावावं लागतं रोजच्या रोज
     घड्याळाच्या काट्यांसोबत
     पेलून धरावं लागतंच नेहमी
     स्वतःला आव्हानांसोबत

     झोकून द्यावं लागतं स्वतःला
     स्थिर, निरंतर लक्ष्यासोबत
     जीवन जगावंच लागतं
     हो.. हो.. जगावंच लागतं
    अखंड कष्टांच्या धुंद नशेसोबत

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       १७/११/२०१६.

No comments:

Post a Comment