Friday, 11 November 2016

शालजोडीतलं

काळ्या धनाचं धाबं दणाणलं
    कचरा ढीगांमधून हजारोंच्या नोटांचं
      तुणतुणं वाजलं
     कधी नव्हे ते या लोकांचं मन
     गरीबांसाठी उदार झालं
      मोठ्या मनाच्या दानतीला
       कधी नव्हे ते उधाण आलं
     दाबू दाबू आजवर ठेवला काळा पैसा
      दाखविण्या आज बँक पोस्टाला
       काळीज यांचं थरकापू लागलं

      मंदिरांच्या दानपेटीत हजारोंचं
        वास्तव्य दिसू लागलं
     आधीच लपविलेल्या काळ्या धनाचं
     बेकारीत आज काळीज तुटू लागलं
      पाहून मांडलेला नोटांचा हा बाजार
       गांधींनाही खुदकन् हसू आलं
        एकादशीच्या विठ्ठलालाही
      लोकंहो, तुम्ही आज बाजूला केलं
       'आधी नोटोबा मग विठोबा'
        नामाचा जप करु लागलं

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      ११ नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment