पराक्रमी, अतुल्य शक्ती
तू
युध्दकलानिपुण तू
झाशीची राणी तू....
मनकर्णिका तू....
रणरागिणी तू
फेकला तटाहूनी घोडा
तू
महाराष्ट्राची कन्या तू
'मेरी झाँसी
नहीं दूंगी'
निडरपणे सांगणारी तू
निर्भया तू, निडर
स्त्री तू
स्त्री शक्तीची स्फूर्ती
तू
बाळ पाठीशी
घेऊनी लढली
थोर, बलशाली
मर्दानी तू
इंग्रजांशी शूरपणे झुंजणारी
तू
तळपती, लखलखती दामिनी
तू
आमच्या मनाची स्वामिनी
तू
प्रेरणादायी, स्फूर्तिदायी तू
अबला नसून
सबला तू
कालातीत आदर्श तू
भारताची शान तू
स्त्री मनाचा अभिमान
तू
शौर्याचा परिपाठ तू
वीरगतीने अमर तू
इतिहासाचं सोनेरी पान
तू
शूरतेचं बनलीस उपमान
तू
झाशीची राणी तू.....
मनकर्णिका तू.....
रणरागिणी तू.....
झाशीची राणी तू....
रणरागिणी तू......
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१९ नोव्हेंबर
२०१६.
No comments:
Post a Comment