Saturday, 12 November 2016

धुमाकूळ

    दिवस कामं सोडून रांगेत
    रात्री नोटांच्या कैदेत
    घामाघूम अधिकारी कंटाळलेत
    कसं होणार सामान्यांचं??
    कसं होणार प्रौढ नागरिकांच??
    प्रश्न तर सा-यांनाच पडलेत!!
   
     काळ्या पैशांचा ज्यांच्यावर जू
     दिवसरात्र नोटा ते लागले मोजू
  कुठे आणि कुणाकडे झुकेल न्याय तराजू
   काय सुरु धुमाकूळ हा आजूबाजू??
     माहित नाहीत उत्तरे कोणतीच
      सरकारच्या निर्णयाची तर
       घ्यावीच लागते बाजू
      पेचात मात्र सारेच पडलेत!!

    हजार, पाचशे, गंगेला मिळालेत
    काळ्या पैशालाही लोकं बघा,
    गंगेच्या पाण्यात बुडवू लागलेत
      नोटांचे पाणी पाणी झाले
    सामान्यांचे मात्र खूपच हाल झाले
       कधी नव्हे ते चोर मात्र
     चोरीचा विचार टाळू लागलेत
 निर्णय सरकारचे ऐतिहासिक ठरु लागले
    दोनच नोटा!! पण सारे वातावरण
     गंमतीशीर बनू लागले
    मिडियावाल्यांना खरपूस विषय
      मिळू लागले
   नोटांच्या करामतींनी देश हलवू लागले
      धुमाकूळ बघण्या हा सारा
     काही बघे खूप मजा घेऊ लागले

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      १२ नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment