कितीतरी ओझी वाहत
असतं
शहरातल्या असो वा
गावातल्या
कुठेतरी एखाद्या गल्लीबोळांत;
चुपचाप, मुकाट्याने आडोशाला;
कुणाच्याही अधेमधे न
येता,
शांततेत बिच्चारं उभं
असतं
.....तरीही का हो
ते गाढव असतं??
गावातलं 'ढ' म्हणजेच
'गाढव'
असं म्हणून
जग त्याला हिणवत
असतं
तुच्छ नजरा, हेटाळणी,
पिळवणूक, कष्ट,
यांना सामोरं जात
असतं
ढेंच्यू, ढेंच्यू असं
ओरडून काहीतरी
सांगायचा प्रयत्न करीत
असतं
आपली भाषा,
त्याची भाषा यांत
मोठं अंतर
असतं
.....तरीही का हो
ते गाढव असतं??
इतर प्राण्यांसारखं
ते माणसांवर
कधी गुरगुरत
नसतं, डोळे वटारत
नसतं
मांजरीसारखं अंगावर येत
नसतं
कुत्र्यांसारखं भुंकत नसतं
वाघांसारखं डरकाळी फोडत
नसतं
डासांसारखं चोट्टं बनून,
कुठूनही,
कसंही घुसून चावत
नसतं
त्याच्या वाट्याला जाणाऱ्यांना
लाथ मात्र
ते मारत असतं
सतावणा-यांना लाथ
मारणं
हे तर
त्याच्या अखत्यारीत असतं
.....तरीही का हो
ते गाढव असतं??
सतत काहीतरी
विचारात ते उभं
आहे
असं त्याला
पाहिल्यावर वाटत राहतं
ढेंच्यू त्याने म्हंटलं
की मला मात्र
त्याला थँक्यू म्हणावंसं
वाटत
कां कुणास
ठाऊक, पण गाढवाविषयी
मला नेहमीच
प्रेम वाटू लागतं
त्याला कुरवाळावंसं वाटतं
त्याचा लोभ करावा
असं वाटतं
त्याची छेड काढून
त्याचा तिरस्कार
करणाऱ्यांना; त्याला 'ढ' म्हणणा-यांना;
'माणसा, माणसा, कधी
होशील रं माणूस?'
असं;
बहिणाबाईसारखं ओरडून सांगावसं
वाटतं, ज्या कोणी
प्रथम त्याला
गाढव म्हंटलं
असेल त्याला जाऊन
भेटावसं वाटतं
इतक्या शांत आणि
मुक्या प्राण्याला
गाढव म्हणून
बदनाम लोकांनी केलं
असतं
.....तरीही का हो
ते गाढव असतं??
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
६ नोव्हेंबर
२०१६.
No comments:
Post a Comment