विठ्ठला
रे विठ्ठला
हरी ओम
विठ्ठला
आज भजनात
तुझ्या दंग
आज कीर्तनाला
चढे रंग
आज कार्तिकी
एकादशीला गाऊ
तव नामाचा
रे अभंग
विठ्ठला रे विठ्ठला
हरी ओम
विठ्ठला
आसमंत दुमदुमे सारा
भक्तीचा तव महिमा
न्यारा
भक्तीने भरला ओतप्रोत
सहृदयी मनांचा गाभारा
शीळ घाली
वारंवार आज वारा
विठ्ठला रे विठ्ठला
हरी ओम
विठ्ठला
विठ्ठल रखुमाई तू
भक्तांची माय माऊली
तू
वरदायी, अखंड साऊली
तू
भेटण्या तव आतुर
झाला
दर्शन घेण्या तव
जीव आसुसला
देहभान हे विसरुन
सारा
विठ्ठल नामाचा गजर
झाला
विठ्ठला रे विठ्ठला
हरी ओम
विठ्ठला
आषाढी, कार्तिकीला भक्तगणांचा
मेळा दाटला
भक्तीरसात न्हाऊन निघाला
चन्द्रभागेचा काठ सारा
साकडं घालती प्रेमाचं
सारे
लाडक्या सावळ्या विठूला
विठ्ठला रे विठ्ठला
हरी
ओम विठ्ठला
तुळशीमाळ शोभे गळा
कासे पितांबर
पिवळा
प्रसन्न मूर्ती तू
घननीळा
कंठी शोभे
कौस्तुभ मणिमाला
विटेवरी उभा राहूनी
पोसितो
अवघ्या जगाचा संसार
विठ्ठला रे विठ्ठला
हरी ओम
विठ्ठला
नसानसातून भिनले नाम
विठ्ठल
देहमंदिरात तू स्थिर
विठ्ठल
पंढरीचा राजा देव
विठ्ठल
ओसंडून वाहो या
धरणीला
तव प्रसन्न
कृपेचा महापूर
मिळो तव
कृपे चैतन्य साठा
भरपूर
दुःखान्त होवो, सुख
दाटूनी येवो
अवघ्या जीवन कळा
होवो दूर
हेच मागणे
तुला आज विठ्ठला
विठ्ठला रे विठ्ठला
हरी ओम
विठ्ठला
विठ्ठला रे विठ्ठला
हरी ओम
विठ्ठला
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
११ नोव्हेंबर
२०१६.
No comments:
Post a Comment