Thursday, 17 November 2016

तरुण

     तरुण कसा असण्यातला?
     तरुण कसा दिसण्यातला?
   
     मनातल्या अस्पष्ट, धूसर,
   कल्पनाविश्वाच्या गुलाबी धुक्यातला
   सुंदर, विलोभनीय, आकर्षक,
     मोहक दिसण्यातला

  थरथर, उत्कटता, प्रेम वाटण्यातला
बिनधास्त, बेधडक धडक मारण्यातला

   धिटाईने धडपड करण्यातला
काहीतरी हटके करण्याच्या उमेदीतला

 मनस्वी विचार, भावनांच्या प्रवाहातला
  नसानसातून वाहणाऱ्या सळसळ,
   गरम रक्तातला

   उदंड आशा, उल्हास जीवनातला
अपार आसक्ती, कुतूहल बाळगण्यातला

शूर, वीर, पराक्रमी, निधड्या छातीतला
वरदानच असतो तरुण, तरुण वयातला
वरदानच असतो तरुण, तरुण वयातला
   तरुण वयातला.........!!!

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       १७/११/२०१६.

No comments:

Post a Comment