Saturday, 5 November 2016

दोन स्पेशल

    मी असायची जेंव्हा आनंदी
    तूही असायचास तेंव्हा आनंदी
     बोलतोस तू माझ्यासवे
     हसतोस तू माझ्यासवे 
     रमतोस तू माझ्यासवे
     करमतं तुला माझ्यासवे
    रात्रं रात्रं जागतोस तू माझ्यासवे
    मला जे आवडतं तेच तुलाही आवडतं
    तुला जे आवडतं तेच मलाही भावतं
     आवडी निवडी अपुल्या सारख्या
        छंद अपुले सारखे
     रम्य पहाटे उठून संवाद अपुले बोलके
     मन तुझ्याकडे म्हणूनच तर धावतं
     भेटलास तू की बेभान होऊन नाचतं
    दोघे आपण मग दुनिया विसरुन सारी
     बागडतो स्वच्छंदी, बनतो स्वच्छंदी
       मी असायची जेंव्हा आनंदी
      तूही असायचास तेंव्हा आनंदी

        रंगूनी रंगात तुझ्या
       रंग राहिला माझा वेगळा
       कुणास ठाऊक, कसं ठाऊक
        कसं सांगू, कुणा सांगू; पण,
        जीव तुझ्यातच रंगला
       मन झालं वेडं तुझ्याच विचारात
       जीव कसा रे तुझ्यामध्ये गुंतला
           मुरलेलं प्रेम आपुलं
          जपलेलं नातं आपुलं
        नाही त्यात दुजाभाव कसला
        जी हालत तुझ्या प्रेमात माझी
       तीच हालत माझ्या प्रेमात तुझी
       सांगसी वारंवार तू मजला
         दोघे मिळून केल्या गोष्टी
        सुखदुःखाच्याही गुजगोष्टी
       मिळून मिसळून वागता एकमेकांशी
         वाद उरे कधीच कसला
          नातं बनलं दोघांचं आता
       प्रेम ताजंतवानं झालं दोघांचं आता
       हिरवंकच्चं बहरलं मन दोघांचं जणू
        पिकलेलं फळ करवंदी....

        मी असायची जेंव्हा आनंदी
      तूही असायचास तेंव्हा आनंदी
    
   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment