Friday, 18 November 2016

वाढदिवस

    आनंदाच्या उत्सवाचा
    वर्षागणिक वाढण्याचा
   जन्मदात्यांच्या आठवणींचा
   त्यांचा आशिर्वाद घेण्याचा
    आजन्म ऋणात राहावयाचा
     नवे संकल्प करावयाचा
    नातेवाईकांच्या गाठीभेटीचा
    मित्रमैत्रिणींच्या मेळाव्याचा
    शुभेच्छांच्या बरसातीचा
    लहानग्यांच्या मनमौजीचा
     राजेशाही थाटामाटाचा
    आजच्या दिवसाचा राजा मीच
     म्हणून मिरवत जाण्याचा
     मिष्टानांवर ताव मारण्याचा
     सर्वांना पार्टी देण्याचा
    वाढदिवसाच्या खास भेटवस्तूंचा
      आनंद वाटून देण्याचा
      आनंद वाटून घेण्याचा
     वर्षभरासाठी स्मृती साठविण्याचा
     क्षणाक्षणाला मृत्यूच्या जाणिवेचा
     तरीही.... वाढता वाढता वाढवितो
     माणूस आनंद वाढदिवसाचा
      आनंद वाढदिवसाचा.......!!!

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        १८/११/२०१६.

No comments:

Post a Comment