वारंवार यावा असा
वार
रविवार हो रविवार
नोकरी, घरकामांनी जीव
झाला
त्रस्त, चेहरा झाला
त्रासिक फार
आरामासाठीचा हक्काचा वार
रविवार हो रविवार
आनंद झाला
मनाला
उजाडता रविवार
कसचं काय
हो, कसचं काय
रविवारी करु म्हणूनी
कामे अनंत
भारंभार
आठवड्याची भाजी, धान्य
आठवडी बाजार भरा
आठवड्याच्या कपड्यांचा
घरभर पडला
ढीग सारा
पुरता वाट लागे
आवरता हा पसारा
इस्त्री घडीचा मांडला
थाट न्यारा
घड्याळात आणि चेहऱ्यावर
कळले नाही
कधी वाजले बारा
अचानक पाहुणे येती
घरा
सरबराई आता त्यांची
करा
गप्पागोष्टीत पण वेळ
गेला बरा
भेटून त्यांना आनंद
झाला खरा
whatsapp च्या मित्र
मैत्रिणींचा
चढला की
हो खूप पारा
कुठे हरवलीस
तू म्हणूनी
messages पाठविती भराभरा
काय करु??
कसे करु??
फोन एकीकडे,
मी एकीकडे
आता चालू
लागली तरातरा
विसाव्यासाठी आता मात्र
सा-यांनाच
विसरा
नको आवाज
कुठला म्हणूनी
फोनही बंद करा
कारण.... सारी संपली
धावपळ
वाजले रात्रीचे बारा
काम आणि
काम करत करत
कधी संपला
रविवार बिच्चारा
..... तरीही वाटतो हा
दिवस
इतर दिवसांपेक्षा
न्यारा
जरीही असला कामांचा
व्याप सारा
मन निवांत
होई त्याच्यावर
सोपवून कामांचा भार
सारा
रविवार वाटे हवाहवासा
आवडतो मजला हा
वार खरा
..... तरीही म्हणते दोस्तांनो!!!...
वारंवार यावा असा
वार
रविवार हो रविवार
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१३ नोव्हेंबर
२०१६.
No comments:
Post a Comment