Saturday, 1 October 2016

भाव - भक्ती

आसवांचा खेळ चाले आसवांशी
    जीवन कसे बदलते चित्रफिती
भावभावनांचा फुलोरा फुलवतो मायानगरी
कोवळे सुंदर भावपुष्प भिडते जनजनांतरी
  भावनाच आकारतात विचारांतूनी
विचारांच्या पाकळ्या विखुरतात मनमनांतरी
कोणती वेळ कशी येईल याचा थांगपत्ता सांगेल का कुणी?
आजपर्यन्त सुगावा लागला नाही. जीवनाचा तळ गाठेल का कुणी?
हुलकावणी देणार घडोघडी आणि खेळ चालेल कडोनिकडी
   करावी इच्छा एक आणि होणार भलतेच
   ताळमेळ जमतच नाही हे तर नित्याचेच.
भावना डबडबतात डोळे आणि प्रसवतात काव्य
 जीवनयज्ञ तेव्हाच होतो संपन्न जेव्हा मिळत जाते हव्य 
गांधींनी आकृष्ट केले जनमानस कारण देशभक्तीची भावना
देशाच्या स्वातंत्र्याची कामना, देशाच्या स्वातंत्र्याची कामना
भावनांच्या नाट्याने घडवले अनेकानेक इतिहास
भावनांच्या आवर्तात घेतल्या गटांगळ्या कितीही झाला परिहास 
भावनांचा गाभा निर्मी साहित्याची आभा
सुखदुःखाची प्रभा वेटाळी सा-या विश्वनभा
यावच्चंद्र दिवाकरौ निर्मिती फुलवते भावनेच्या कोंबा
फुली फुलून येते सारे विश्व, जेव्हा प्रसन्न होते जगदंबा

     संगीता पाटखेडकर.

     २९ सप्टेंबर २०१६.

No comments:

Post a Comment