तुझ्या दिव्यत्वाची
प्रभावळ
भारुन टाकी आसमंत
सारा
तुझ्या तेजाची ज्योती,
तुझ्या व्यक्तित्त्वाची
महती,
आकर्षिते विश्व सारे
घेऊन सर्वांना सांगाती
तुझे नेतृत्व आणि
शक्ती
वाढविते तुझ्यावरची
भक्ती
ललिता पंचमीला पूजतात
तुला साहित्याचा उत्सव तू निर्मितेस सरस्वती साहित्याचा उत्सव तू निर्मितेस सरस्वती
घरोघरी श्रेष्ठतम अध्यात्म
ग्रंथांचे होते
पूजन आणि पठन
तुझ्या ध्यान-धारणा
आणि आराधनेने
घडले आहेत आजवर विद्या
वाचस्पति
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
सर्व कलांची आराध्य
देवता तू
शारदे तू; हंसगामिनी, मयूरवाहिनी तू,
वीणावादिनी तू
लालित्य तुझ्या कणाकणांत
सौंदर्य तुझ्या आविष्कारात
साहित्याची तू उद्गाती
कलानिर्मितीची तू
स्फूर्ती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
तुझे अस्तित्व तेजाचा
गाभा
सा-या विश्वावर मोहिनी
घाली तुझी प्रभा
आळवतात तुला तनमनधनाने
सारे जण
वारंवार करती तुझे
स्तवन
प्रसन्न होतेस तू आणि
करतेस त्यांच्या
घरी वसती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
शिल्प, नाट्य, काव्य,
समीक्षा
संगीत, नृत्य, आणि
विविध तितिक्षा
या सर्वांवरच असते
तुझे लक्ष
तू आणि तूच रसिकांचा
कक्ष
तुझ्यामागे कलावंत
आणि रसिक धावती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
सरस्वती, शारदे, ललिते
धाव, पाव गेsss
मनाची निरांजने तेवली
तुझ्याचसाठी गेsss
भक्तीचा वसा दिलास
तू
मी आनंदित गेsss
वेधिते निरंतर तुझी
श्रीमंती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
साहित्याचा उत्सव तू
निर्मितेस सरस्वती
संगीता पाटखेडकर.
६ अॉक्टोबर २०१६.
देवी सरस्वतीचे सुंदर स्तवन.
ReplyDelete