चांदण्यांची
खैरात लेऊनी
नक्षत्रांचा साज लेऊनी
रात्रीस खेळ मांडते
ही रात चंदेरी
आज आली
कोजागिरी
आज आली
कोजागिरी
कोण कोण
जागरण करी
कोण जागे
आहे सखी री
पाहण्या लक्ष्मी येई
घरोघरी
आज आली
कोजागिरी
आज आली
कोजागिरी
गुलाबी थंडीची झुळूक
न्यारी
केळीच्या पानांची सजावट
अंगणी
बसविले भुलगा-भुलाबाई
समजून
लक्ष्मीन्द्र, शिव आणि
गौरी
आज आली
कोजागिरी
आज आली
कोजागिरी
घरोघरीच्या मुलींचा उत्साह
भारी
गाणी गाती
भुलगा-भुलाईची
घेऊनी हाती टिपरी
नाद तो
दुमदुमे अंबरी
खिरापत करण्या माऊली
लगबग करी
आज आली
कोजागिरी
आज आली
कोजागिरी
चांदण......चांदण प्रकाशी....
दूध आटवण्या
सज्ज नारी
बासुंदीच्या स्वादाला उपमा
नसे दुसरी
पूर्णचन्द्र हासरा आणि
रोहिणी हासरी
आली कोजागिरी
आली कोजागिरी
आज रात
दिसे नवी, नवेली
साजिरी
सुंदर दिसती सा-या मैत्रीणी
एकत्र जागती रात
सारी
आटो न
अपुल्या दोस्तीची खुमारी
आटो न
अपुली प्रेमाची यारी
जणू साद
घालती आज सा-या नभांतरी
आज आली
कोजागिरी
आज आली
कोजागिरी
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१५ अॉक्टोबर
२०१६.
No comments:
Post a Comment