ब्रह्माची तू कन्या
ब्रह्माची तू निर्मिती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
तुझ्या कृपेने मिळती
साहित्याच्या खाणी
तुझ्या कृपेने मिळती
शब्द, उच्चार वाणी
ब्रह्मरुपिणी सरस्वती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
तुझ्या कृपेने मिळती
गायन, वादन समृध्दी
तुझ्या कृपेने मिळती
नाट्य, संगीत, बुध्दी
ब्रह्मरुपिणी सरस्वती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
भेटसी तू ग्रंथात
भेटसी तू ज्ञानात
भेटसी तू विद्येत
भेटसी तू मोरपिसांत
ब्रह्मरुपिणी सरस्वती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
मोर पिसारा तुजसाठी
फुलविती
हंस नाचती, आनंदाने
डोलती
होवो आम्हां ज्ञान
प्राप्ती
वरदानें तव मिळो
कीर्ती
उजळो तव आशिर्वादे
मम जीवन कांती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
तुझ्याजवळ असे
ज्ञान सागर
खुले कर अमुच्यासाठी
तू हे भांडार
विनविते आज तुला
वारंवार
ज्ञान असे आम्हां
अगदीच कणभर
वंदन करण्या तुला
कर माझे जुळती
ब्रह्मरुपिणी
सरस्वती
ब्रह्मरुपिणी
सरस्वती
सदासदय प्रसन्न
तव मूर्ती
शांत, कोमल तव मुख
वसे चित्ती
कलागुणदायी, विद्यादायी
तू
द्यावी आम्हां सुबुध्दी,
सन्मती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
ब्रह्मरुपिणी सरस्वती
ब्रह्मा, विष्णू,
महेश, तुज वंदिती
संत, महात्मे थोर;
भजन तुझे गाती
या धरतीवर सर्वांची
होवो आत्मोन्नती
माझी आत्मोन्नती
तुमची आत्मोन्नती
ब्रह्मरुपिणी
सरस्वती
ब्रह्मरुपिणी
सरस्वती
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
७ अॉक्टोबर २०१६.
No comments:
Post a Comment