Saturday, 1 October 2016

वरदायिनी 'शक्ती'

रेणुके, अंबिके, तुळजे, शारदे, जगदंबे मायभवानी
  स्तवन करिती तुझे सारे नवरात्रीच्या नऊ दिनी
  नवबीज अंकुरतील ओल्या मातीच्या कुशीतूनी
   तव घटस्थापना ती करुनी, नंदादीप उजळोनी
  उजळतील दशदिशा आणि आसमंत सारा या नऊ दिनी
  मारिसी दानवगण आणि राक्षसांना तू
    नवरात्री अखंड झगडुनी
  पराक्रम तुझा अद्भुत आणि अतुल्य असे गे, महिषासुरमर्दिनी, जय अंबिके मायभवानी  गौरी, नारायणी, चंडिका, दुर्गा, सरस्वती, महालक्ष्मी तूच
  स्त्री शक्तीरुप तुझे पाहता प्रसन्न होतसे मुख
  तूच विश्वाची जननी, तूच अमुची मनमोहिनी, जय अंबिके, दुर्गे भवानी
   शक्ती अखंड आम्हां द्यावी तू
  तुजला विनवितो आम्ही निशिदिनी
  भवसागर हा पार करु आम्ही
  संकटास मात देऊनी
बल दे, बुद्धी दे, तेज दे, नवचेतना दे आम्हां
    प्रसन्न तव कृपा होऊनी
  जय अंबिके मायभवानी गे, जय तुळजा भवानी
   दशमीचा सोहळा होतसे नयनरम्य तो दशम दिनी
  उत्साहाला येतसे उधाण, विजयोत्सव तो साजरा करुनी
  विजयी होवो आम्ही सारे, विजयी राहो देश सदा  लहान असो वा थोर असो, प्रगती होवो अमुची सदा  तव कृपे सन्मार्गी वळो आयुष्य सदा
  लाभो आरोग्यसंपन्न आयुष्य आम्हांस सदा
   हाच 'जोगवा' तुज मागूनी
  वरदहस्त तुझा शिरी ठेवूनी
 वाटचाल ही आयुष्याची करु गे
  जय आई अंबिके रेणुके, जय तुळजा  भवानी.

  मृदुला मुकुंद पाटखेडकर.

    १ अॉक्टोबर २०१६.

No comments:

Post a Comment