मनात असता
तुझी आठवण
भावभावनांची त्यात ठेवण
....... संपू नये
कधी.....
..... ही रात्र
संपू नये कधी.....
कधी आठवणी
गप्पांच्या
कधी आठवणी
सख्यांच्या
सोबत करती
सदा अपुल्या नात्याच्या
मन पिंगा
घाली त्याभोवती
फिरतसे का वणवण???...
मनात असता
तुझी आठवण
भावभावनांची त्यात ठेवण
.......संपू नये
कधी.....
..... ही रात्र
संपू नये कधी....
कधी आठवणी
प्रवासाच्या
हातात हात घालूनी
फिरायाच्या
कधी आठवणी
थंडीच्या दिवसांच्या
दाटून येती दाट
धुक्यासारख्या
कधी आठवणी
अबोल प्रीतीच्या
एकमेका न पाहताही
समजण्याच्या
मनाने तुझ्यासोबत असण्याच्या
जाणिवा नेणिवांच्या पलीकडच्या
काय सांगू,
कसं सांगू, कसं
लागलं?
मनाला या आठवणींचं
कोंदण
मनात असता
तुझी आठवण
भावभावनांची त्यात ठेवण
.......संपू नये
कधी.....
..... ही रात्र
संपू नये कधी.....
कधी आठवणी
सुखदुःखाच्या
तुझ्यासवे दुःखाचे डोंगर
झेलल्याच्या
कधी आठवणी
कातरवेळीच्या
दोघांनी मिळूनी घेतलेल्या
वचनांच्या
कधी आठवणी
माहेरच्या
कधी आठवणी
सासरच्या
कितीतरी घेतलेल्या साड्यांच्या
तरीही... मनात पैठणी
जपल्याच्या
किती हे
आठवणींचं मिळालं आंदण
मनात असता
तुझी आठवण
भावभावनांची त्यात ठेवण
.......संपू नये
कधी.....
..... ही रात्र
संपू नये कधी.....
कधी आठवणी
दोघांनी
पाहिलेल्या स्वप्नांच्या
कधी आठवणी;
काडी काडी जमवून
बांधलेल्या घरट्याच्या
कधी आठवणी
जीवलगांच्या
कधी आठवणी
विरहाच्या
कधी आठवणी
माया, ममतेच्या
किती!!,,, ह्या
आठवणींची....!!
संपता संपेना साठवण
मनात असता
तुझी आठवण
भावभावनांची त्यात ठेवण
....संपू नये
कधी.....
.... ही रात्र
संपू नये कधी.....
कधी आठवणी
निःस्वार्थ प्रेमाच्या
विश्वासाच्या प्रवाहात तुझ्यासवे
स्वतःला झोकून देण्याच्या
कधी आठवणी
तुझ्यासवे घालविलेल्या
क्षण अन्
क्षणाच्या, क्षण अन्
क्षणाच्या कधी
आठवणी नियतीच्या निष्ठूरपणाच्या
इच्छा नसतांनाही, गरज
नसतांनाही;
तुला, शेवटचा निरोप
देण्याच्या
तुला, शेवटचा निरोप
देण्याच्या
आज दाटलं
या रात्री
आज जमलं
या रात्री
आज साचलं
या रात्री
मनांत जपलं या
रात्री
तुझ्या प्रीतीचं चांदणं
तुझ्या प्रीतीचं चांदणं
मनात असता
तुझी आठवण
भावभावनांची त्यात ठेवण
...... संपू नये
कधी.....
..... ही रात्र
संपू नये कधी.....
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
२३ अॉक्टोबर
२०१६.
No comments:
Post a Comment