अचानक ती येते दारात
राहते नित्य माझ्या
मनांत
करते माझ्यासवे हितगुज
तिच दिसते रोज मला
स्वप्नांत
तूच माझी कविता
तूच माझी कविता
भेटतेस तू मला कविता
दिसतेस तू मला कविता
आवडतेस तू मला कविता
ध्यानी, मनी, स्वप्नीं
तूच
तूच माझी कविता
तूच माझी कविता
फुलते मी तुला पाहुनी
बागडते मी तुझ्या
अंगणी
तुला पाहता सुख मिळे
साजणी
तूच माझी कविता
तूच माझी कविता
मन बोलवी तुज सदा
साद घाली तुज सदा
तूच माझी सखी
तूच माझी सोबती
तूच माझी कविता
तूच माझी कविता
तुझ्यासवे शब्द जुळती
तुझ्यासवे भाव आकळती
मम मनीचा ठाव घेतेस
तू किती
मम उरीचा घाव सोसतेस
तू किती
तूच माझी कविता
तूच माझी कविता
कधीही येतेस तु
मनांत
कधीही भेटतेस तु
दिवसात
कधी जागवतेस मज
रात्रीत
नाही कळत, नाही
कळत
खेळ तव पाहुनी
होतसे मी स्तिमित
तूच माझी कविता
तूच माझी कविता
आलीस तू आज भेटण्या
शब्दालंकार घेवूनी
साहित्य साज चढवूनी
तुझ्यामधे दिसे
मज
सरस्वतीची दिव्यता
तूच माझी कविता
तूच माझी कविता
तू येताच शब्द झाले
मोती
तू येताच वाक्य
झाले मोती
तू येताच अक्षर
झाले मोती
जडली आज तुझ्यावर
प्रीति
दिसली मज तव दिव्यता
प्रगटलीस तू काव्य
सरिता
तूच माझी कविता
तूच माझी कविता
मृदुला मुकुंद
पाटखेडकर.
७ अॉक्टोबर २०१६.
No comments:
Post a Comment