ओळखीचे होतो कधी
अनोळखी झालो आज
प्रीतीच्या प्रेमळ नयनांत
आज दुःखाश्रूंचा
साज
सांगायचे होते तुला
मला काहीतरी
सांगायचे होते मला
तुला काहीतरी
राहूनच गेले सांगायचे
कितीही वाटून आता
काय उपयोग
आज
तुझी जागा
हृदयात माझ्या
तुझी जागा
नयनांत माझ्या
तुझी जागा
घरात माझ्या
नाही दुसऱ्या
कुणा द्यावी वाटत
तुझ्या नी माझ्या
प्रेमाचे गूढ
नाही कुणा
सांगावे वाटत
दव पसरले
तुझ्या आठवणींचे
मन झाले
व्याकूळ आज
गुंतता हृदय हे
प्रेमात
रमून गेले
मी तुझ्यात
रमता रमता
तुझ्यात
गुंग झाले
या नात्यात
तुटता वीण तुटेना
ही
कितीही तोडली तरी
दूर गेलो
कितीही जरी
मनात जवळ
तू अजूनतरी
उच्छ्वास सांगे श्वासाला
मजला वारंवार
आज
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
२७ अॉक्टोबर
२०१६.
No comments:
Post a Comment