उधळीत रंगांची रांगोळी
हळूच पावलाने
आली
उन्हं ल्याली कोवळी
पसरली किरणे सोवळी
आली दिवाळी
आली दिवाळी
रंगीबेरंगी पणत्यांच्या ओळी
उजळती अंधःकाराची काजळी
अमावस्येच्या कातरवेळी
खुलते मनामनांची कळी
येता लक्ष्मी
घरोघरी; राऊळी
आली दिवाळी
आली दिवाळी
अक्षवानाचा शुभ लाल
टिळा
शोभतसे प्रत्येकाच्या कपाळी
चंदन, उटणे, सुगंधी
तेल
अमृतस्नानें येतसे कांती
झळाळी
आली दिवाळी
आली दिवाळी
अस्वच्छतेचा, पापाचा नरक जाळी
आंगण सजले
शिंपूनी सडा,रांगोळी
अती पहाटे;
शुध्द स्नानें
आळवूनी मुकुंदा मुरारी
जणू भासे
पहाट घननिळी, घननिळी
आली दिवाळी
आली दिवाळी
वडील, मुलीच्या नात्याचा
गोडवा
दीपोत्सवाचा थाट असे
हा पाडवा
फराळ, फटाके, नवीन
कपडे
मायेच्या ऊबेने न
जाणवे गारवा
दिव्यांची रोषणाई आणि
झगमगाट
सृष्टीला शोभा तेजःपुंजाळी
आली दिवाळी
आली दिवाळी
भाऊबीजेला न्यारी नव्हाळी
लाडक्या भाऊरायाला बहीण
ओवाळी
जमली जीवलग
नातलगांची मांदियाळी
सुख, समृध्दी,
आरोग्य, ज्ञानाने
फुलो आयुष्य
फूल पाकळी
प्रकाशपर्व हे दीपांचे
भरुन काढो
तिमिराची पोकळी.......
काढो भरुन
तिमिराची पोकळी
आली दिवाळी
आली दिवाळी
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१४ अॉक्टोबर २०१६.
No comments:
Post a Comment