नारद तुंबर गायन करिती
संपदा, समृध्दी, आबादी
ऋध्दी आणि सिध्दी
या देवता फेर धरुनी
नाचती
घाग-या फुंकिती
गजर करिती
जागर करिती
गोंधळ घालिती
जोगवा मागती
टाळ आणि चिपळ्या
पेटी आणि तबला
सदैव सिध्द राहती
पक्वान्नांचे भरले
ताट
पुरणपोळी आणि वडे
यांचा
सर्वजण घेती स्वाद
तुला सर्वच आवडते
-
करंजी, लाडू, मोदक
अनारसे आणि चकल्या
आंबिलीचा तुला संतोष
विविध खिरी आणि
चटण्या
बायका सज्ज सर्वांना
वाटण्या
सुवासिनींच्या ओट्या
भरल्या जातात
खण, नारळ, हळकंड,
सुपारी आणि खोबरे
तांबूलाने भरले
जातात तोबरे
महावस्त्रांची होते
सळसळ
मळवट भरले जातात
सुहास्यवदनाने सुवासिनी
तुला जागवितात
भजन, कीर्तन, पारायण
सप्तशतीचे
ज्यांना जे जमेल
ते करतात
आवर्तन लक्ष्मीसूक्ताचे
वातावरणाला तू कह्यात
घेतेस
तुझ्या आविष्काराचा
प्रत्यय देतेस
घेता घेता, ओटी
माझी भरुन जाते
तुला सर्वच आवडते
स्वच्छता जिथे
तिथे तू असते
फुलाफळांचा बहरलेला
तूच निर्मिलेला
निसर्ग
तुझे तुलाच
अर्पण
लाभू दे सदैव
तुझाच संसर्ग
आळविता; आळविता.....
मन तुझ्याकडे
झेपावते
तूच होऊन
जाते
तूच होऊन
जाते
संगीता पाटखेडकर.
१० अॉक्टोबर
२०१६.
No comments:
Post a Comment