शब्द मनाला भिडती
शब्द मनाला
खुणावती
शब्द भावनेशी
खेळती
शब्दा शब्दाने भाव
उचंबळती
शब्दा शब्दाने नाती
फुलती
शब्द मना
मनांना जुळविती
शब्दांची किमया ती
किती
जाणता एकेक शब्दा
तूला
जणू भासती
सागर मोती
शब्द अर्थ
संवाहन करिती
शब्द भावार्थ
उलगडती
शब्द मधुर
गोडवा आणती
शब्द कटू;
जणू काटे बोचती
शहाण्याला शब्दच मार
देती
प्रेरणा, बळ शब्दानेच
मिळती
बुडत्याला काठीचा आधार
शब्दच देती
शब्द सांगती
भाषा महती
शब्दच असती अपुली
खरी संपत्ती
शब्द असे
एक; अनेक अर्थ
त्यात निघती
शब्द झाली
रत्ने
शब्द झाले
मोती
शब्दधन वेचिता आयुष्य
सरते किती
होवो मनांत
शब्दा, तुझीच भरती
शब्दांची जादू कळता
जडली तुजवर प्रीती
शब्द, शब्द, आणि
शब्दांचीच होवो प्राप्ती
शब्दानेच; शब्दाशब्दातून; शब्दा
तूला
करते आज
मी ही विनंती
प्रसन्न होऊनी शब्दा
तू,
सदैव यावे
मागुती
शब्दा, सदैव यावे
मागुती
शब्दा, सदैव यावे
मागुती
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१८/१०/२०१६.
No comments:
Post a Comment