Tuesday, 4 October 2016

जयजयकार

 नवरात्रीच्या नऊ दिनी अंबेचा शृंगार
 नानाविध आभूषणें आणि अलंकार
 नित्यनवा भरजरी शालू शोभतसे सुंदर
 अष्टभुजा मिरविसी अंबा, दिसशी तू सुंदर
  दिसशी रेणुका तू सुंदर
  दिसशी तुळजा तू सुंदर
  दिसशी सरस्वती तू सुंदर
  दिसशी लक्ष्मी तू सुंदर
  तुझे रुप सुंदर
  तुझे ध्यान सुंदर
  तुझे स्वप्न सुंदर
  तुझी लीला सुंदर
 सुंदराणि असशी अंबा तू
  सुंदराणि सुंदर

तुझ्या आगमने दिसे हा अश्विन मास सुंदर
 अश्विन मास सुंदर
   आठवुनि तव रुप सुंदर
    आळवुनि तव रुप सुंदर
   स्तवुनि तव रुप सुंदर
   करिते मी वंदन त्रिवार
   करिते मी वंदन त्रिवार

 नवरात्री असशी तू युध्दावर करितो रात्रंदिन आम्ही तुझा जागर  होतसे सर्वदूर तुझ्या नामाचा गजर
   तुझ्या नामाचा गजर
  
    सज्जनांस असे तुझा आधार
    दुष्टांवर करिसी तू प्रहार
    दुष्टांना निर्दाळुनि तू
    भक्तांचा करिसी उध्दार
    रेणुका, भक्तांचा करिसी उध्दार
    त्रिपुर सुंदरी शरण तुज आम्ही वारंवार
  शरण येतो तुज वारंवार
  तुझी महती काय वर्णू मी
     ती असे थोर
     ती असे थोर
   
  रात्रंदिन असे आम्हा युध्दाचा प्रसंग
  असे युध्दाचा प्रसंग
  प्रसन्न होऊनि आम्हां तू
   करी दुष्टांचा संहार
   करी दुष्टांचा संहार
   झेलुनि घेई या भक्तांस तू वरचेवर
शक्ती देई मात कराया संकटांवर
 आळविते तुज वारंवार
  
विजयादशमीच्या दिवशी होतसे चमत्कार
 नवदिन तव पराक्रमाचा विजय होतसे साकार
 विजय होतसे साकार  त्रिभुवनी तुझा जयजयकार त्रिभुवनी तुझा जयजयकार
  
    प्रसन्न हो तू आम्हांवर
    प्रसन्न हो तू भारतावर रेणुके, लवकर ये, नको करुस उशीर रेणुके, लवकर ये, नको करुस उशीर
   करिते मी वंदन त्रिवार
   करिते मी वंदन त्रिवार
   सुंदराणि अंबा तू
   सुंदराणि सुंदर
   सुंदराणि सुंदर.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

     ४ अॉक्टोबर २०१६.

No comments:

Post a Comment