रात्रीच्या काळोखातूनी काढीत
वाट
रोजच येतसे
पहाट
रोजच येतसे
पहाट
काळोख असतो घनदाट
रात्रीचा असो की
मनामनांचा
दुःख, निराशा, काळजीचे
जाळे
विणतो; मनाभोवती दाट
रात्रीच्या काळोखातूनी काढीत
वाट
रोजच येतसे
पहाट
रोजच येतसे
पहाट
पहाटेची असते सर्वांनाच
वाट
नवी उमेद,
नवी आशा, नवसंकल्प
देती;
दुःख, निराशा, काळजीला
काटछाट
रात्रीच्या काळोखातूनी काढीत
वाट
रोजच येतसे
पहाट
रोजच येतसे
पहाट
पहाट जणू
दिसते की हो,
कुमारिका कोवळी
पसरवित किरणे दाहीदिशा
निरागस सोवळी
दूर होतसे
सर्वदूर अंधार काजळी
रात्रीच्या काळोखातूनी काढीत
वाट
रोजच येतसे
पहाट
रोजच येतसे
पहाट
कळ्या फुलती, झाडे
डोलती
प्राणी बागडती, पक्षी
किलबिलती
मोर थुईथुई
नाच करिती
उत्साही किरणे मनामनांत
संचारती
अंधारावर स्वार होऊनी
जणू;
मिळविती यशाची वाट
रात्रीच्या काळोखातूनी काढीत
वाट
रोजच येतसे
पहाट
रोजच येतसे
पहाट
सापडो निरंतर आम्हा
प्रकाश पायवाट अज्ञान, अंधःकार,
अंधश्रध्देला देऊनी मात
उधळीत आनंद, उत्साहाची
लयलूट
घेऊनी ये पहाट
तू, सदैव तुझा
असा थाट
घेऊनी ये पहाट
तू, सदैव तुझा
असा थाट
रात्रीच्या काळोखातूनी काढीत
वाट
रोजच येतसे
पहाट
रोजच येतसे
पहाट
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१९/१०/२०१६.
No comments:
Post a Comment