गोष्ट तशी गमतीची
दिवाळीच्या दिवसांची
लज्जत भारी फराळाची
तृप्त खळगी पोटाची
रंगीबेरंगी कपड्यांची
रंगीबेरंगी साड्यांची
रंगीबेरंगी शालू नि
पैठण्यांची
केसात माळलेल्या गज-यांची
हौस भागतसे
नटण्या मुरडण्याची
वडील, मुलीच्या आपुलकीची
पती, पत्नीच्या
प्रेमाची
बहीण भावाच्या
जिव्हाळ्याची
द्वितीयेच्या चन्द्र साक्षीची
गाठभेट घडवी जीवलग
नात्यांची
सोनेरी क्षणांच्या सोबतीची
आकाशदिव्यांच्या साथीची
तिमिराकडून तेजाची
अंतरंगातल्या उत्साहाची
स्वच्छतेच्या प्रतीकाची
अज्ञान, अंधःकार नाशाची
घननिळ्याच्या सावलीची
लक्ष्मीच्या सोनपावलांची
ओढ तिच्या
स्वागताची
रांगोळी संस्कार भारतीची
दिव्य पणत्यांच्या प्रकाशाची
मनाला साद देणाऱ्या
ज्योतींची
घराघराला शोभा झगमगाटाची
गरीब असो
वा श्रीमंतांची
ध्वनीप्रदूषणविरहित फटाक्यांची
पवित्रता आणि मांगल्याची
स्फूर्तिदायी, विवेकी विचारांची
शिदोरी मिळे संस्कारांची
थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची
दिव्यत्वाच्या प्रचितीची
रात्रीच्या लखलख सौंदर्याची
खुलते कळी फुलाफुलांची
खुलते हास्यकळी मनामनांची
वर्षागणिक येणाऱ्या दिवाळीची
आनंदाच्या टिकलीची
वेगानं उंच जाणाऱ्या
प्रकाशाच्या झाडांची
प्रकाश सांडणा-या
फुलबाज्यांची
धडधडणा-या लवंगीची
आकाशात झेपावणा-या
रॉकेटची
शुभेच्छांच्या वर्षावाची
मजा अशी
ही चार दिवसांची
गोष्ट तशी गमतीची
दिवाळीच्या दिवसांची....
दिवाळीच्या दिवसांची.... !!!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
३० अॉक्टोबर
२०१६.
No comments:
Post a Comment