Sunday, 14 February 2016

गद्य आणि काव्याचा मिलाफ 1

शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध याद्वारेच निर्माण होतात सर्व ईषणा, वित्तेषणा, लोकेषणा,पुत्रेषणा, कामेषणा
कामरस म्हणजे जगतनिर्मिती
त्यातूनच आजवर चालली आहे सर्व उत्पत्ती 
जिथे उत्पत्ती तिथे लय हे तर ठरलेलेच
कारण या मागच्या ईषणा आहेत लौकिक आणि मर्त्य
निंदा नाही करायची याची कारण यात आहे फारच प्रभावी सामर्थ्य 
या सर्वांतच माणूस मानतो आनंद 
कारण त्याला गवसला नसतो ब्रह्मानंद
जेंव्हा ईषणांना होतो 
पारस-परीस स्पर्श 
तेंव्हा बदलून जाते सर्व दृष्टी आणि होतो हर्ष 
कोणता हा परीस? तर 
'रामरतन धन पायो
पायो जी मैने रामरतन धन पायो!' -  मीरा
ईषणा या लौकिक,भौतिक आनंद देणारी रत्न तर रामरत्न हे अखंड, उदंड, नित्य आनंद देणारे धन. हाच ब्रह्मानंद.
ब्रह्म हे आनदांचे स्वरुप हे मीरेला कळले म्हणून ती म्हणते
भवसागर अब सूख गयो l
फिकर नहीं मोहे तनमनकी
कर कृपा अपनायो
पायो जी मैने रामरतन धन
पायो l
'ब्रह्मानंदं परमसुखदम् केवलम्
ज्ञानमूर्तिम्' वर्णन केले जाते गुरुंचे
असे गुरु आणि मीरेसारखे भक्त बनण्याचे ध्येय असावे
सर्वांचे
हनुमान रामाचा सर्वश्रेष्ठ भक्त
रामदास रामाचे उपासक
भक्तीची पराकाष्ठा दिसते यांच्या जीवनात 
चैतन्य महाप्रभू तर नाचत नाचत, गात गात जायचे म्हणतात रस्त्यांवरून 
वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याने रचले रामायण
रामाने बदलून टाकला सारा दशरथाचा इतिहास
जगताला दिले आदर्श भरभरुन
"नाहं वसामि वैकुण्ठे l
योगिनां हृदये रवौ
मद्भक्ता यत्र गायन्ती l
तत्र तिष्ठामि नारद " l  असे
स्वतः विष्णू नारदाला सांगतात.
       भक्तीचे महत्व मोठे 
           ठसवा मनात


       संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment