Sunday, 14 February 2016

तुझ्यामुळेच

तुझ्यावाचून जीवन आधे-अधूरे
संसाराचा मोठा पट मिळाला मला, मुलांनी केले आयुष्य पुरे
तरी का म्हणतेस जीवन आधे-अधूरे
कारण कधीच वाटत नाही ना झाले सर्व स्वप्न खरे
स्वप्नांच्या दुनियेत जगले तुझ्याबरोबर
तुझ्यामुळेच आयुष्याला अर्थ आला, वाटले नाहीच कधी हे सर्व संपेल सारे
पण तू नाहीस का अजूनही माझ्याबरोबर
माझ्याबरोबरच तर आहेस, कितीक आठवणींची उजळणी होते रोजच मनात, क्षणही विसंबत नाही तुला
मग संपले सारे, कसे म्हणतेस?  आयुष्य तर अखंडच राहणार, या जन्मी नाही तर कोणत्यातरी जन्मी भेटणारच ना आपण! स्वप्न प्रत्यक्षात उतरणार, कारण 'पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते'.
संपणार नाही काहीच, काहीच नाही आधे-अधूरे
हा विश्वास ठेव म्हणजे, मिळणारच तुला नेहमीच सारे
आनंद शोधावा लागत नाही
आनंदाचे काही एक ठिकाण नाही
आयुष्याची सोबत तो नेहमीच करत असतो, प्रत्येक गोष्टीत आनंद मानावा लागतो- हे शिकविले त्यानेच मला- म्हणूनच आजही त्याच्याबरोबरच माझे जगणे आहे.   
 जो आठवणींतून जात नाही, त्याला गेले तरी कसे म्हणायचे? सोबत-सोबत तर हीच ना? जन्मोजन्मीची सोबत मिळणारच मला- माझे स्वप्न राहणार नाही कधीच आधे-अधूरे
डोळ्यांसमोर चमकणार नाहीत कधीच तारे
अढळ धृवतारा तूच; स्थिरच अखंड माझ्या आयुष्यात
जन्मोजन्मीची साथ तुझी हाच मला विश्वास!
तुझ्यामुळेच जीवन तरले- अखंड तरणार
विश्वासाचा पारा नेहमीच साथ करणार!


        संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment