Sunday, 14 February 2016

आपला 'मान' आपल्या हाती.

प्रत्येक घरातील वडीलधा-या मंडळींनी आपल्या मुलांशी जास्तीतजास्त जास्त संवाद मराठीतून साधला पाहिजे. आजकाल आई-वडील मुले यांच्यात कायम इंग्रजीत संभाषण होताना अनेक मराठी घरांमधून दृश्य दिसते. विचारांचे आदान-प्रदान स्वभाषेतून व्यक्त झाले तर आपोआपच मराठी भाषेच्या संवर्धनाचे बीजारोपण होईल. इतर राज्यातील लोकांना त्यांच्या स्थानिक संस्कृती भाषेचा कमालीचा अभिमान असतो. याउलट आपल्या राज्यातील स्थिती आहे. आपल्यापैकी बरेच जण असे असतात की जे मराठी भाषेची महाराष्ट्रातील  संस्कृतीची स्वतःच हेटाळणी करतात. याचा अर्थ इंग्रजी किंवा इतर भाषा शिकू नये असा नाही; पण आपल्या मराठी भाषेचा मान राखून! मी विशाल दोन वर्षांपूर्वी आळंदीला गेलो होतो. तिथे बरेच विदेशी पर्यटक ज्ञानेश्वरांच्या 'संजीवन समाधी' चे दर्शन घेण्याकरिता मराठी भाषा शिकण्याकरिता आले होते. एका इंग्रज लेखकाने,आपली शेवटची घटिका जवळ आली असे कळताच गीता वाचली होती. इतर भाषिक, प्रांतिक, विदेशी लोक जर आपल्या संस्कृती भाषेचा अभ्यास करतात तर मग आपल्याला आपल्या भाषेचा संस्कृतीचा अभिमान का असू नये? सर्वकाही आपल्याच हातात आहे. आपल्या भाषेचा 'मान' आपणच ठेवला तरच आपली मान कुणीही पिरगाळणार नाही. ती ताठच राहील असे मला वाटते.

      मृदुला पाटखेडकर.


No comments:

Post a Comment