Sunday, 14 February 2016

साग्रसंगीत

ते १७ नोव्हेंबर २०१५ पर्यंतचे दिवस अकल्पितपणे खूपच घाईगडबडीचे एकदम खूपच घटना समोर घेऊन उगवले. कारण हा दिवाळीचा मोसम अमोलकडे हैद्राबादला लक्ष्मीपूजन आटोपून सुधीरकडे बंगलोरला   दिवस वास्तव्याचा कार्यक्रम ठरविला. अकोला ते हैद्राबाद, हैद्राबाद ते बंगलोर, बंगलोर ते हैद्राबाद हैद्राबाद ते पुनश्च अकोला. अबब! केवढा हा प्रवास!  हे सर्व पार पाडावयाचे तर होतेच पण ते खूपच चांगल्या पध्दतीने पार पडले. अजून अकोल्याला जावयाचे आहे. उद्याची गाडी आहे. उद्या रात्रीपर्यंत पोहचू
पण हत्ती गेलेला आहे-शेपूटच राहिले आहे. त्यामुळे काहीच चिंता नाही. पुनश्च हरी ओम् करण्यापूर्वी म्हंटले थोडा आढावा घेऊ या घटनांचा
लखलखाट पणत्यांचा, दीपमाळांचा हे दिवाळीचे वैशिष्ट्य. खाण्याच्या पदार्थांचा आस्वाद पोट सांभाळून घेतला तरच ती खरी दिवाळी ठरणार. नियोजन सर्वच गोष्टींचे करावे लागते.
अमोलकडे साग्रसंगीत पोळपाटरंगीत लक्ष्मीपूजन झाले. लक्ष्मीची चांदीची मूर्ती
रांगोळीतील लक्ष्मीची फुलांनी केलेली सजावट, लक्ष्मीची पावले, लक्ष्मीसूक्त, सगळ्या 
आरत्या-धुपारत्या, नैवेद्याला
खूपशा पक्वान्नांचे ताट, १६ दिव्यांची पुरणाची आरती.
जितके जमेल तितके झाले. देवाचे कितीही केले तरी ते कमीच असते; आणि आपण ते करीत नसतोच मुळात, 'तो
करवून घेत असतो. बंगलोरला पोचलो. आईचे दर्शन झाले.
सगळे पावले. 'वात्सल्यसिंधू
आई'  खूपच प्रेरणा देणारी.
शिका तिच्यापासून काय काय शिकता येईल ते, असे तिचे व्यक्तिमत्त्व. आई खूपच प्रसन्न वाटली. आनंद झाला. 'प्रेम रतन धन पायो'  सिनेमाही पाहिला.  मनःपूर्वक गोष्टी करायचे ठरविले की 'दिवाळीचा सण मोठा l
आनंदा नाही तोटा'  हे तर घडणारच! निनाद तर इतका गोड हासतो की त्याचे हासणे तुम्हाला कितीतरी पटीने उत्साहित करते. हासणे हा एक उत्तम व्यायाम आहे
रामदेवबाबाने सांगितलेले पोटाचे व्यायाम करण्याची जरुरतच नाही. खळखळून हसा! उत्साहाला उधाण आलेच म्हणून समजा
सुधीर-कविताची आदरातिथ्याची वागणूक लोभस! तोड नाही! राजूची कंपनीही पाहिली. एक वर्षात इतका प्रोग्रेस! ब्रेव्हो!  कितीतरी शाखांचा तो C.E.O.
व्हावा या शुभेच्छा तर देऊ शकतोच. 'अभिजित', 'सुचित्रा', 'अनिका' यांचाही सहवास घडला. आनंदाची भरती अनुभवली. सुधीरच्या घरापासून जवळ असलेले सरोवर म्हणा, तळे म्हणा पाहिले. पर्यावरणाचा एक चांगला अनुभव घेतला. मैल रपेटही झाली. लिहिले तर एक प्रबंध होईल! पण थोडक्यात गोडी. बंगलोरहून हैद्राबादला वापस येतांना 'हरे रामा, हरे कृष्णा' चे एक मंदिर पाहिले. तिथे अभिषेक चालू होता. त्याचा आस्वाद घेतला. देवालय खूपच छान. मोठे मोठे घोडे चित्ताकर्षक!  मृदुलाजवळ प्रसादाचा जांभळांचा हार येऊन पडला. चैतन्य महाप्रभूवरचे पुस्तक विकत घेतले. अविस्मरणीय क्षणांनी आयुष्याची पणती तेजाळली.
हे देवालय 'अनंतपूर' या गावी आहे. प्रसादाचा हार तुमच्या पुढ्यात पडणे हे खूप भाग्याचे समजले जाते. तेथील खूप बायका खूप आश्चर्याने मृदुलाकडे बघत होत्या. आम्ही पाचही जणांनी अभिषेक त्यावेळी होणाऱ्या जपसंकीर्तनाचा खूपच आनंद लुटला. एकूण आम्हा सर्वांची दिवाळी- 'प्रेमरतन धन' दिवाळी ठरली.

     संगीता पाटखेडकर.


No comments:

Post a Comment