कोजागिरी पौर्णिमेचे काय वाणू लावण्य? सर्वांच्याच मनात जागू लागते चैतन्य
शरदऋतूतील धान्याची नव्हाळी
खाद्य पदार्थांना आणते भलतीच झळाळी
आटीव मसालायुक्त दुधात पडतात चंद्राचे अमृत किरण
आप्तेष्टमित्रांच्या सहवासात घ्यावा स्वाद व व्हावे मनोमिलन
चंद्राची व चांदण्यांची लखलखती दिवाळी
यौवनाच्या आनंदाला आणते भलतीच नव्हाळी
खूप गाणे आहेत चंद्र-चांदण्यांवर
कमीतकमी आजतरी येऊ द्या ओठांवर
घ्या खुमारी मोसमाची
आठवण करा सर्वांची
आनंदाला येऊ द्या भरती
समुद्राला नाही आज ओहोटी
तुम्हीच का मागे राहता
सर्वांना द्या गाठीभेटी
आनंदाचा वर्षाव करा
नाचून, गाऊन सर्वांसाठी
जो जागरण करतो त्याला लक्ष्मी भेटते म्हणतात
लक्ष्मीच्या निवासासाठी तरी महालक्ष्मी नाव येऊ द्या ओठात
लक्ष्मींद्राचे स्वागत करा घ्या पुण्य बांधुन गाठी
अविस्मरणीय करा रात्र पुन्हा आहेतच रोजच्या कटकटी
भुलगा-भुलाबाईची गाणी रंगतात वाजवून टिप-या
सर्व मुले आपलीच वाटतात कोणीच वाटत नाही उप-या
हाच तर आहे खरा सणाचा आनंद !
हाच तर खरा ब्रम्हानंद !
नवीन कपडे आणि पुरणपोळी, जोडीला बासुंदी
काय खावे नि काय सोडावे, पोटाची खळगी आहे तुटपुंजी
"शुभ कोजागर्ति"
संगीता पाटखेडकर
No comments:
Post a Comment