Sunday, 14 February 2016

कशात काय नि फाटक्यात पाय!

मन स्थिरावले, स्थिरावले म्हणता म्हणता 
ते कुठच्या कुठे पळाले, काहीच कळत नसते.
अहंकाराचा पगडा भारी l
नारदालाही सुटला नाही
'कामा' वर विजय मिळविला वाटून l तो सांगता झाला ब्रह्मदेवाला
ब्रह्मदेव म्हणाला, महादेवाला सांगू नकोस
महादेव 'मोहिनी' च्या पाठीमागे धावला l
महादेवाला आवडत नसे, स्वतःचे कौतुक म्हणून त्याने हे नाट्य केले
'अव्याहत गती' नारदाला प्राप्त
तो विष्णूला सांगता झाला l
विष्णूने हसून 'मोहिनी रुप' ही लक्ष्मीचीच लीला l सर्वत्र तीच नटली l तू ओळखू शकला नाहीस l सर्वत्र मातेचाच संचार l मातेवरच भाळलास?
नारदाची ही कथा? नारद व्यक्तिरेखा अत्यंत अभ्यसनीय!
मोठ्यामोठ्यांची तारांबळ उडाली, तितरबितर झाली l
अहंकाराचा वरचष्मा! ती घोरपड सुटता सुटत नाही!
अग्नीच्या ज्वाळांनी तिचा नाश करावयाचा असतो
कोणता हा अग्नी? तर 'सत्यं शिवं सुंदराचे' ज्ञान
नटला, रे नटला तो सर्वत्र नटला
'मी आणि माझे' च्या वर्चस्वाने तू किती दाटला?
मोठ्यामोठ्यांची उडली भंबेरी, विश्वामित्राचा तोल सुटला
इंद्राचे इंद्रपद डळमळले l
त्रिशंकू अधांतरी राहिला l
इतिहासाच्या पानोपानी अहंकाराचा ताठा l
जिरवा ना गर्व त्याचा तरच माणूस मोठा l
विवेकानंद देतात आश्वासन l
पूर्णत्वाला प्राप्त होशील रे मानवा!
कारण तूही त्याचेच स्वरुप, त्याची आस राहणारच तुला l
जिथे दुर्दम्य इच्छाशक्ती, निष्ठा आणि भक्तीचा आहे निदिध्यास l तिथे काहीच नाही अशक्य, फक्त करावा लागणार खडतर अभ्यास l
'अभ्यासोनि प्रकट व्हावे
वायफळ बडबड करण्यात अर्थ काय?
कशाला टेंबा मिरवतेस? कशात काय नि फाटक्यात पाय!


      संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment