Sunday, 14 February 2016

गद्य आणि काव्याचा मिलाफ 2

     'आत्मनस्तु कामाय'
याज्ञवल्क्य ऋषींना होत्या दोन बायकाl गार्गी आणि मैत्रेयी
त्या काळातील विदुषी, करायच्या चर्चा ऋषींबरोबर,
जणु त्यांच्या सहाध्यायीl
ऋषींनी एकदा विचारलेl माणसाला सर्वात प्रिय काय?
त्यांनी उत्तर दिले - 'आत्मनस्तु कामाय l सर्वं प्रियं भवति'
अर्थ असा - स्वतःच्या आत्म्याला आवडणारे तेच प्रिय असते. माणसाचे स्वतःवर फार प्रेम असते, म्हणून बाकी प्रिय असते.
कुणाच्या आत्म्याची ताकद सर्वांना सामावून घेणारी असते. का होतात महात्मा गांधी आणि विवेकानंद प्रिय?
खेचतात लोकांना त्यांच्या 
आत्मचैतन्याने. एक पंचा नेसणारा माणूस l किती लोक
धावतात त्याच्या पाठीमागे?l
विवेकानंद बुध्दीच्या पासंगावर तावून सुलाखून निघालेला मार्ग कवटाळतो,
वेड्यापिशा वाटणाऱ्या रामकृष्ण परमहंसाच्या आत्मचैतन्याने भारावून आणि त्या चैतन्याने सळसळून l
भारावून टाकतो अमेरिकेच्या 
भौतिक, आर्थिक पुष्टतेला l
का होतात कलाकार प्रिय?
गर्दी खेचतात स्वतःभोवती l
कलेचे सामर्थ्यच तसे.......
वा-याबरोबर पसरते त्यांची
ख्याती. का होते शेगाव-शिर्डी
सारख्या ठिकाणी अखंड गर्दी?  का जातात वारकरी 
पंढरपूरला अडचणींना ठेचकाळत असतांना सर्दी
का होतात देवालयात - पूजा
आरत्या, भजने आणि प्रवचन
कीर्तने?
सामान्यांच्या ठिकाणी असते 
भक्ती, निष्ठा आणि या सर्वांविषयी मनात उठणारी 
चैतन्यदायी आवर्तने 
आत्मा हे चैतन्य तेच खेचते एकमेकांना, म्हणून प्रिय वाटू लागतात सर्व गोष्टी परस्परांना कुणामध्ये या चैतन्याचे प्रमाण जास्ती असते म्हणून ते बनतात धुरंधर l
शिवाजीमध्ये सळसळते चैतन्य, म्हणूनच तो जिंकू शकला गड किल्ले आणि पुरंदर
चैतन्याचे प्रमाण वाढविता येते काय?  हो.
योगाभ्यास, भक्ती आणि कार्यावरील निष्ठा
करा प्रयत्नांची पराकाष्ठा 
मग हाती गवसणारच यश.
काय?   हो.


      संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment