Saturday, 13 February 2016

गुलकंद

प्रमोद, गीता, विश्राम, विजया, अरुण, वृंदा, सुधीर. सात व्यक्तित्वे एकत्र गुंफलीत प्रमिला सदाशिव मोहरीर या कर्तव्यदक्ष, जबाबदार, सुशील आणि शिक्षणप्रेमी अशा जोडगोळीने! या सर्वांमधील प्रेम वाखाणण्याजोगे आहे. प्रेमाचा गुलकंद निर्माण झाला आहे. सात अपत्त्यांच्या शाखा तयार झाल्या. गुलाबांचा ताटवा विस्तारला. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक! 'बालकदिन' नेहरुंच्या जन्मदिवसाच्या नावाने साजरा केला जातो. ते नेहमी त्यांच्या कोटाला गुलाबाचे फूल लावायचे. गुलाब हे रसिकतेचे प्रतीक! आज 'रथसप्तमी' 'Valentine' दिवस! दोन्हीही दिवस मला बाबांची आठवण करुन देतात. त्यांनी काढलेला तो सात घोड्यांचा रथ, सूर्यनारायणाची केलेली पूजा, वालाच्या शेंगाची भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी, तांदळाची खीर, तिळाची साटोरी, कोसल्या या आईने केलेल्या स्वयंपाकाची चव आजही जीभेवर आहे. सर्व काही नुकतेच घडले असे वाटावे इतका त्या सर्व घटनांचा परिणाम मनावर दडविण्याचे सामर्थ्य आई-बाबांच्या कृतीत कुठून आले? 'सर्वांवर प्रेम' ही भावना अनेकांच्या मनात त्यांनी त्यांच्या वागण्याने बिंबविली! आयुष्याच्या पारिसावर कष्टाचे गंध उगाळून त्यांनी शिक्षणाच्या रक्तचंदनाचा टिळा सर्व मुलांच्या भाळी लावला आणि आई-बाबांच्या या परिसस्पर्शाने सर्व मुलांच्या आयुष्याचे सोने झाले असे वाटते. 'सात'ला काय महत्व आहे? ऋषी सात महत्वाचे(सप्तर्षि). सूर्याच्या रथाचे सात घोडे महत्वाचे. सात धान्ये, सात बोरे, सात रुईची पाने सूर्याला अर्पण करुन पूजा करावयाची! सात आश्चर्ये, आठवड्याचे सात दिवस(सप्ताह), सप्तशृंगी शक्तिपीठ, 'सप्तशतीचा जप, होम, हवन करुनिया हो' या देवीच्या आरतीतील ओळी, साता समुद्रापार, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया 'वटसावित्री व्रत' करतात, 'सत्ती लावणी' हा पत्त्यांचा खेळ, इंद्रधनुष्यातील रंग सात, 'वेडात मराठे वीर दौडले सात' ही कुसुमाग्रजांची प्रसिध्द कविता आहे, सातपुडा पर्वत, Seven Ladders of Heaven, 'एक तीळ सात जणांनी वाटून खावा' अशी अपेक्षागणिताच्या परिभाषेतील सात हा Prime number आहे, सप्तसूर - सा,रे,,,,,नि,सा. सारी दुनिया डोलविण्याची किमया या सुरांमध्ये! 'धनाजीराव वाकडे सात ठिकाणी हेकडे', हे बोलीभाषेतील एखाद्याला डिवचण्यासाठी वापरलेले वाक्य! त्वचेला सात आवरणे असतात. अग्नीसाक्षीने विवाहमंगलप्रसंगी सप्तपदी होते, सात फेरे घेतले जातात. माणसाच्या शरीरात सात चक्रे असतात. समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी ही चक्रे जागृत करावी लागतात. 'मूलाधार, स्वधिष्ठान, मनिपुरा, अनाहत, विशुद्ध, अंज, सहस्त्रार' ही ती सात चक्रे होत. गजानन महाराज प्रकटदिन माघ वद्य सप्तमी! 'येळकोट येळकोट जय मल्हार'. 'येळकोट' म्हणजे सात कोटी सैन्य! एखाद्याच्या आत्यंतिक सुखाबद्दल आणि एखाद्याच्या आत्यंतिक रागाबद्दल हिंदीत बोलले जाते 'सातवे आसमानपर'! पाताळही सात आहेत(सप्तपाताळ) 'सार्क' परिषदेत सात देश सहभागी असतात. द्वीपसमूह सात(Seven Union Territories of India), 'MOHARIR' मध्ये सात अक्षरे आहेत. 'सदाशिव-प्रमिला' सात अक्षरे. //१९४५ चा माझा जन्मदिवस! ..(etc.etc.) 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' l - साने गुरुजी.
'जे खळांची व्यंकटी सांडो l
तया सत्कर्मी रती वाढो l
भूता परस्परे जडो l
मैत्र जीवांचे' l - ज्ञानेश्वर.
प्रेमाचा संदेश 'Valentine Shiplay' या संतानेही दिला!
प्रियकर-प्रेयसीचे प्रेम एवढाच या दिवसाचा अर्थ नाही. गुलकंद हा तब्येतीसाठी खूप चांगला असतो. गुलाबपाकळ्या स्वच्छ धुवून काचेच्या स्वच्छ बरणीत टाकायच्या. साखरपेरणी त्यावर करायची. अशा पद्धतीने थरावर थर रचायचे. बरणीचे झाकण लावून ती बरणी उन्हात ठेवायची. काही काळाने गुलकंद तयार! याचा अर्थ सूज्ञांनी लावून आयुष्याचा गुलकंद तयार केल्यास सार्थक झाले समजावे! आम्हा सातांच्या शाखा विस्तारल्या, विस्तारणार आहेत आणि विस्तारत राहणार! या सर्व शाखोपशाखांना माझ्याकडून या दोन्ही दिवसांच्या खूप खूप  शुभेच्छा! आम्हीही  म्हणू शकतो - 'हम सात साथ साथ है' l

       संगीता पाटखेडकर.

        १४//२०१६.

No comments:

Post a Comment