प्रमोदने मला आणून दिले होते
चांगल्या क्वालिटीचे कागद
आणि ते नीट ठेवण्यासाठी फाईल्स.
मला खूप आनंद झाला l कितीतरी नोटस् काढायच्या होत्या मला !
सारे सारस्वत जमा झाले कागदांवर l
ह्याने हे म्हंटले व त्याने ते म्हंटले
ह्या कवितेचा संदर्भ हा व त्या कवीची माहिती ही
हा ह्या नाट्यकृतीचा लेखक व ही नाट्याची परंपरा
हे संतसाहित्य व ते शाहिरी साहित्य
हे आधुनिक व हे ऐतिहासिक
काय नि काय?
माहितीच माहिती उतरली कागदांवर l
परीक्षा तरी काय नेमलेल्या पुस्तकांवरच अवलंबून
पाठ्यपुस्तके वाचा आणि लिहा प्रश्नांची उत्तरे
तुमची मते आणि विचार यांना नव्हतेच कधी त्यात स्थान!
तुम्ही उतरले गुणवत्तेत की किती तुम्हाला आनंद!
आनंद तर होताच पण आता त्यात मन रमत नाही
दुसऱ्यांचीच मते व विचार, किती वापरणार पांगुळगाडा तुम्ही
स्वतःचे विचार, मते, अनुभव, कल्पना जेंव्हा उतरतात कागदावर तेंव्हा त्यात प्रकट होते सरस्वती कारण ती तुम्हाला प्रसन्न असते म्हणूनच ती कागदावर अवतरते.
वाणीतूनही होते बरं का ती प्रकट l पण जेंव्हा ती कागदावर उतरते तेंव्हाच अमर l
या सरस्वतीने होतात क्रांत्या
विचारांची खळबळ
बदलून जातात इतिहास
तुमचेही आयुष्य होते उत्क्रांत
ही उत्क्रांती बदलून टाकते तुमचे आयुष्य
तुम्ही होता अमर आणि राहता लोकांच्या मनात चिरंतन
ही 'सरस्वती' तुम्हाला नेहमीच प्रेरणा देवो ह्याच माझ्या सर्वांना "दिवाळी" च्या शुभेच्छा.
🌺🍀🌸🌋🌠☀💐🌻🌹🌷🌈🎁🎉🎈🎆🎇
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment