Saturday, 13 February 2016

उमज

आता घराकडे देईन म्हणते लक्ष 
इतक्यात अनेक व्यापात फारच झाले दुर्लक्ष 
कोणते इतके व्याप? व्याप की संताप?  संताप तर नव्हता कधी, पण होता एकच ध्यास ध्यास की निदिध्यास
निदिध्यासाने भेटतो म्हणतात तो!  प्रकटच होतो समोर
दिसला की तो तुला...............
कितीकात?   
बाळशास्त्रींच्या कीर्तनात
मावशीच्या पतिप्रेमात!
आईच्या वात्सल्यात
बाबांच्या परिश्रमात!
मुकुंदाच्या सहवासात!
मुलांच्या गुणात
मोठी आई-अण्णाजींच्या निरपेक्ष त्यागात
भावाबहिणींच्या................ शब्दातीत करण्यात!  
सासरच्यांत, माहेरच्यांत 
कितीतरी अगणितांत
'पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे' l 
ज्ञानेश्वरांच्या अभंगातील, लताबाईंनी गायिलेल्या गाण्यात
तुकारामांच्या अभंगात, एकनाथांच्या भारुडात
मुक्ताबाईंच्या 'मुंगी उडाली आकाशी l तिने गिळिले सूर्याशी' l  या पुन्हा लताबाईंनी गायिलेल्या गाण्यात!  
कितीतरी केला अभ्यास
पुस्तकांचा पाडला फडशा
लायब्र-या पालथ्या घातल्या l
कुठेच मन नाही धडशा
कुठे कुठे धुंडतेस l दिसतोही तो तुला l तूच तर म्हणतेस
आता राहा स्वस्थ l काहीच करु नको काम l  
तुझे आहे तुजपाशी
घे जरा विश्राम


संगीता  पाटखेडकर.

No comments:

Post a Comment