Sunday, 14 February 2016

श्री.विश्राम सदाशिवराव मोहरीर

शिक्षणाच्या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कै. सदाशिवराव मोहरीरांचा हा एक सर्वच क्षेत्रात अखंड सेवाभावी वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकणारा कर्तव्यनिष्ठ, आग्रही, परखड रसिक मुलगा. आम्हा सर्व बहिणभावंडांचे त्याच्यावर खूप प्रेम आहे. बाबा चहाला स्पर्शही करत नसत. विश्रामही तसाच! बाबा शेतीवर लक्ष देऊ शकले नाहीत, त्याची व्यथा, याच्यापर्यंत भिडली जेव्हा वेळ मिळाला तेव्हा याने त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. शेतीची समस्या आजच्या काळात खूपच बिकट झाली असताना घेतलेला हा निर्णय निश्चितच धडाडीचा! त्याचे कुटुंबही त्याच्या या कार्यात त्याला मनोभावे साथ देणारे आहे. वीणा तर सर्वच आघाड्यांवर कुशल आहे. मुले सूना, नातवंडे अखंड प्रगतीशील विचारांची आहेत. सगळे 'मोहरीर' कुटुंबात साजरे होणारे सणवार साजरे करण्याची जबाबदारी विश्रामने घेतली आहे. अधिकाधिक निष्ठेने जास्तीतजास्त रीतीने सर्व मंत्रांचा अर्थ समजून घेऊन पूजाविधी पार पाडण्याची त्याची जिद्द बघितली की आनंदाने ऊर भरुन येतो.
 सौ.परिमल-विश्राम, सौ. सुचित्रा-अभिजित, सौ.बागेश्री-पराग या सर्वांनी 'मोहरीर' कुटुंबाच्या या 'विश्राम' शाखेला खूपच बहरविले आहे. या सर्वांना विश्रामच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! विश्रामने घराण्याच्या सर्व सुखदुःखाच्या प्रसंगी काहीच हातचे राखून ठेवता सहभाग दिला आहे. प्रमोदनंतर वैशालीच्या लग्नप्रसंगी पूजेला बसण्याची जबाबदारी असो की कौस्तुभचे लग्न जमविण्याची- या मोठ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत हे विशेष! 'Bank of Baroda' मधून 'Manager' पदावरुन Retired झालेला हा 'विश्राम' मनस्वी आहे. पटते ते पटते-नाही ते नाही, हे तो नेटाने सांगू शकतो हा त्याचा गुण वाखाणण्याजोगा आहे. परमेश्वराने त्याला उदंड आयुष्य देऊन त्याच्याकडून नेहमीच खूप कार्य करुन घ्यावे असे मला वाटते. करणाऱ्या लोकांकडूनच अपेक्षा केल्या जातात! त्याच्या नाती 'अनिका' 'मृण्मयी' ह्या 'महालक्ष्म्या' आहेत. अजून काय हवे?

       संगीता पाटखेडकर.

        //२०१६.

No comments:

Post a Comment