गणपतीच्या घरी ऋध्दी-सिध्दी पाणी भरी
नारद, तुंबर गायन करी
वाजवा रे वाजवा l गा रे गा l
नाचा रे नाचा l
यशदुंदुभी तुझ्या दारी
अव्वल दर्जाचे यश निनादणार नेहमीच
खरे नाणे नेहमीच खणखणणार l बद्द नाही वाजणार l
एका हाताने मिळविले यश, कारण उजवा मेंदू नेहमीच कार्यरत
साधेसुधे, नेहमीचे काम करत असतो डावा मेंदू
असाधारण यशाला उजवा मेंदू नेहमीच साथ करी
वयाचे बंधन नसते यशाला l
कर्तृत्व असते सीमापार
निरंतर यशाचा तू हो शिल्पकार l
स्वतःच्या कर्तृत्वाचा दे जगाला साक्षात्कार
हीच इच्छा आम्हा सर्व आप्तजनांची खरोखरी
संगीता पाटखेडकर.
११/१/२०१६
No comments:
Post a Comment