ॐ अंजनेयाय विद्महे l वायुपुत्राय धीमही l
तन्नो हनुमंत प्रचोदयात् l
आज मंगळवार- दोन मंगलमूर्तींची उपासना आज जरुर करावी. एक गणपती व दुसरे हनुमान. आज राष्ट्रीय युवा दिवस. स्वामी विवेकानंदांची जयंती- १२ जानेवारी. गणपती, हनुमान व स्वामी विवेकानंद या तीनही व्यक्ती विलक्षण चैतन्यशाली. निरंतर प्रेरणेचा स्त्रोत. युवकांनी आदर्शांचा परिपाठ घेण्यासाठी इतरत्र पाहण्याची गरजच नाही असे.
ॐ एकदंताय विद्महे l वक्रतुंडाय धीमही l
तन्नोदंती प्रचोदयात् l
हा गणपती मंत्र १०८ वेळा म्हणून बघण्याचा अभ्यास करावा. मंत्रशक्ती जाणवेल!
'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत' - स्वामी विवेकानंदांचा आदेश मानणारा, श्रेष्ठत्व प्राप्त करणार नाही, हे कसे शक्य आहे? अवलंबन करुन बघावे. आजच्यापेक्षा उद्या उन्नती, उद्यापेक्षा परवा. वरच्या श्रेणीला पोहोचण्याची आकांक्षा ठेवली तर आकाश ठेंगणे व्हायला वेळ लागणार नाही.
संगीता पाटखेडकर.
१२/१/२०१६
No comments:
Post a Comment