"The Positive thinker sees the invisible, feels the
intangible and achieves the impossible; Positive attitudes create a chain
reaction of positive thoughts".
'नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' - ज्ञान फक्त भौतिक नाही - आध्यात्मिकही - संपन्न करणारा माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. त्याच्या ज्ञानप्रेरणा त्याला सर्वच बाबतीत निर्धास्त बनवितात. खरे ज्ञान माणसाला निर्भिड बनविते. म्हणतात ना
"Don't wait for your ship to come if it weren't for the last minute,
nothing would get done". सगळ्या शक्यतांची पडताळणी सकारात्मक विचाराच्या व्यक्तीने आधीच मनाशी केली असते. तहान लागली की विहीर खणणारा तो नसतो. गुळाचा गणपती किंवा शेणाचा 'पो' होणे त्याला कधीच पसंत नसते. निराशेचे विचार तो मनापर्यंत येऊच देत नाही. कुणीतरी येईल आणि मदत करील, असा तो कुणावरही अवलंबून राहत नाही. 'येईल हरी आणि देईल खाटल्यावरी' ही त्याची प्रवृत्ती नसते. यत्न हाच त्याचा देव असतो. प्रयत्नांती परमेश्वर ही त्याची निष्ठा असते. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' हा त्याचा आत्मविश्वास असतो. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे' - असा त्याचा ठाम निर्णय असतो. रामदास आठवतात ना! कारण या व्यक्तीने जे कार्य केले ते सकारात्मक व्यक्तित्वाचाच परिपोष नाही का? कोणत्या परिस्थितीत माणूस कसा वागणार? - याचा अभ्यास मानसशास्त्रीय विश्लेषण असल्याशिवाय व्यासप्रतिभा 'महाभारत' निर्माण करु शकली नाही. 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्'. त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तित्वांचे स्वभाव - या व्यतिरिक्त दुसरे काहीच वेगळे असणार नाही - ही त्यांची ख्याती. शेक्सपिअरची नाटके का बरे इतकी गाजली? व्यक्तिरेखा खोलवर मनात ठसणा-या! कोणताही प्रतिभावंत जेव्हा श्रेष्ठ ठरतो तेव्हा तो जीवनाचा सखोल अभ्यासक असतो. 'कलंकी पुढे देव होणार आहे' ठामपणे सांगणारा रामदास किती व्यासंगी, ज्ञानी, आणि भविष्याचा वेध घेणारा असेल? संजीवन समाधी घेणारे 'ज्ञानेश्वर' व 'गजानन महाराज' हे दोघेही सिध्दयोगी होते. येशू ख्रिस्त स्वतःचा क्रूस ओढत नेऊन क्रूसावर लटकला. खिळे ठोकले. किती यातना झाल्या असतील? कुठून आली ही दुःखावर मात करण्याची ताकद! ही सर्व उदाहरणे काय सुचवितात? त्यांचे कार्य, त्यांच्या सिध्दी, त्यांची दुःखावरची मात या सर्व गोष्टी करणे किती कठीण आहे? या व्यक्ती पुन्हा अनेकांना दर्शन देत्या झाल्या म्हणतात. सर्वच अगम्य! याचा अर्थ जीवन अनंत आहे. मरण नाही. मरणाची भीती जर नसेल तर मग सगळा आनंदीआनंदच! खरा Positive तोच ज्याची ही भीती गेली आहे. त्याच्यातल्या चैतन्याची सावली नेहमी त्याच्याबरोबरच असणार ना? 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' चा हा अर्थ आहे असे मला वाटते! गंभीर होऊ नका. ख-या ज्ञानाचा आनंद मिळवा.
"Life is like a mirror. Smile at it.
Everyday is a little life. Live it to its fullest.
The positive mind has extra problem solving power.
Take time to laugh. It is the music of the soul".
positive व्यक्तित्वच सुविचार निर्माण करु शकेल ना?
संगीता पाटखेडकर.
३/२/२०१६.
No comments:
Post a Comment