Saturday, 13 February 2016

अमर्यादित

सांगणे कधी संपत नाही, म्हणून करावे लागतात भाग
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद........संपले का वेद?
नाही- नाही....संपणार कसे, आता आला बालवेद 
तो तरी एका भागात आहे काय?   नाही- नाही.....
त्याचेही झाले की विभागच विभाग......... 
आता तरी सांगून झाले का
नाही.....नाही!   कितीतरी होतील प्रभाग 
चांगलेच आहे की, सांगणे संपायला नको, चालणे थांबायला नको, बोलणे खुंटायला नको अविरत..अविरत...अविरत...
हाच असावा आयुष्याचा अर्थ
सतत वाचन, मनन, चिंतन, आविष्करण  हेच तर जीवन सार्थ
चित्रपटही कितीतरी भागांमध्ये निघतो आहे, आपण पाहतोच ना!  
आनंद कधी संपत नाही. आस्वाद घेतोच ना!   
माणसाचे मन कार्यरत आहे नेहमीच, म्हणूनच निरनिराळ्या स्वरूपात कलाकृती येतात ना!  
किती ह्या कलाकृती? किती ह्या आविष्कृती
माणूस अखंड शोध घेतोच आहे आयुष्याचा
माणसे तरी किती? निसर्गाची व्याप्ति किती, आकाशात तारे किती?  होईल का बरोबर गणती.....सारेच अगणित
प्रत्येकाचे भावविश्व वेगळे.....
मला काही सांगायचेय, म्हणतोच ना
सांग बाबा सांग.........
आम्हालाही ऐकायचेय, मग त्याच्यावर लिहायचेही.....
अरे बाप रे!
संपता संपतच नाही......
अखंडित.......अखंडित........अखंडित!   
गतकाळातल्या किती आठवणी-  आठवतातच ना नेहमी 
आठवणींना उसंत नाही
आठवते मला आठवी नेहमी!
आठवते कृष्णजन्माष्टमी!
मुकुंद होता आठवा
अनंतात झाला विलीन
मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीलाच
काय काय आठवू? .......
किती.....किती लिहू?......
संपता संपेनाच!  
अष्टविनायकांना आठवून
लेखणी ठेवते खाली.


     संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment