ठेका चुकला आयुष्याचा
ठोकाही गडबडला l
तोल नाही राहिला, तालही ढासळला l
टाळ, चिपळ्या, मृदंगाचा ध्वनी कानी आला l
विराण आयुष्याला उत्तररंग गवसला l
उत्तररंग गवसता आकाश झाले निळे l
ढग दूरवर पांगले, आयुष्य झाले सावळे l
सावळ्याच्या ध्यासाने चित्त स्थिरावले l
सगळे किल्मिष नष्ट झाले
पियूषच राहिले l
अमृताची प्यास संपेना l
चित्ताचा ध्यास संपेना l
संपायचे ते संपले l
साधियेले ते तेजच झाले l
तेजाचा ओजस्वीपणा l ओळखीचा वाटला l
'ज्योत से ज्योत जगाते चलो'
मंत्र आठवला l
आठवता-आठवता खूपच काही आठवले l
आळवता आळवता रंगात रंगून गेले l
कुठून आले, कुठवर आले शोध फारच लांबला l
लांबवता लांबवता खूपच ताणला l
अती ताणू नकोस - तुटेल l
जे साधले तेही निसटेल l
निसटून चालेल का? l
कर जोड त्याला l
नमस्काराने स्वाधीन कर त्याला l
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment