हरवले ते गवसले का?
गवसले ते हरवले का?
हा विचार प्रत्येकाने नेहमीच करावयाचा असतो; आणि विशेषतः आधीचे वर्ष-२०१५ साल जाणार व २०१६ साल येणार- यावेळी तर निश्चितच काय मिळविले, काय गवसले, काय हरवले, काय अनपेक्षित असे निश्चितच सापडले याचा आढावा घ्यायलाच हवा! व्यक्तिगणिक बेरीज-वजाबाकी वेगळी राहणार! कोणाला खूप काही गवसले असणार, कोणाला खूप नुकसानीचा सामना करावा लागला असे वाटले असणार! सुखदुःखाचा हा खेळ सर्वांसाठीच आहे. जमाखर्च फक्त आर्थिक बाबतीत नसतो; तर आरोग्य, शांती, समाधान, कार्यनिष्ठा, इतरांसाठी काही केले की नाही या सर्वच बाबतीत विचार केल्यास प्रत्येकाची उत्तरे अर्थातच वेगळी राहणार! असे म्हणतात की जाणाऱ्या वर्षाला आनंदाने निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करावयाचे असते. आधी जे करु शकलो नाही पण इच्छा जरुर आहे असे काहीतरी करुन दाखविण्याचा निश्चय करायचा असतो. अरुण मोहरीरच्या बाबतीत म्हणायचे तर त्याने २०१५ साल खूपच छान घालविले असे मला वाटते. सदाशिव मोरेश्वर मोहरीर(आमचे बाबा) यांच्या 'जन्मशताब्दी' चे निमित्त करुन त्याने 'स्मरणिका' काढली. आमच्या पाताळेश्वर रोड, महाल, नागपूर -२, येथे असलेल्या वाड्यावर त्याने सुरेख काव्य लिहिले. तो वाडा आज नाही; पण अनेकांच्या मनात जिवंत असलेली ही वास्तू त्याने काव्यरुपाने जिवंत केली. विविध प्रकारचे लेखन त्याने करुन स्वतःची लेखन- इच्छा तो जिवंत ठेवू पाहत आहे. त्यासाठीचा अभ्यास त्याला इतका व्यस्त ठेवतो आहे की छोटे-मोठे सांसारिक पाश त्याला आता अडवू शकत नाहीत. ही त्याने २०१५ मध्ये साधलेली फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. सौ. वैशाली रविंद्र गोखले- प्रमोदची मुलगी- हिने सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरितीने सांभाळत 'अनुशा' या नवकन्येची जबाबदारी घेतली ही तर या सालातील सर्वात मोठी घटना. सुधीर सदाशिव मोहरीर याने 'SKAN' नावाची कंपनी काढून ती यशस्वी रीतीने तो हाताळत आहे. हा मोठा निर्णय, त्याचे वेगळे आयुष्य निश्चितच घडविणार आहे. श्रीनिवासचे लग्न झाले. अशा कितीतरी घटना! प्रत्येकाने आढावा घ्यावा असे मला वाटते. घेतही असणार. मी उल्लेख केला एवढेच!
संगीता पाटखेडकर.
३१/१२/२०१५
No comments:
Post a Comment