Saturday, 13 February 2016

नाही कळले कधी. जीव वेडावला.

कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्यात...............
पाताळेश्वराच्या महालातील घरात होते एक आटाळेI ते नाही कधीच पाहिले 
रोजच्या गरजेच्या वस्तू तिथे ठेवल्या होत्या म्हणे
त्यावेळी वाटले नाही त्याचे काहीच आकर्षण! आणि त्यात नव्हते मन
लहानपणी काहीच मोठेसे कळत नसते I कारण फारसा विचार ते करीतच नसते
त्या वस्तूंना काय वाटले असेल? आपण नेहमीच का अडगळीत? आपल्याकडे कुणाचेच का नाही लक्ष? आपण आहोत का इतके दुर्लक्षित
कधीतरी शोध घ्या रे माझा
आज मला आवाज देतात त्या वस्तू 
त्याच आटाळ्यावर राहत होती का वास्तू देवता? आणि आम्हा सर्वांना देत होती प्रेरणा  शिक्षणाची, अभ्यासाची? कळलेच नाही कधी
किती मोठी घरी होती लायब्ररी, पुस्तकांचा छंद होता आणि आवड पाठांतराची
पण काहीच अंतर्मुखता नव्हतीI त्यामुळे कळली नाही त्याची काहीच महतीI त्या पुस्तकांचा घ्यायला हवा होता आस्वाद, कितीतरी झाला असता फायदा- पण सर्व राहूनच गेले
कितीतरी पूजापाठ झालेत तिथेI वास्तू झाली मंत्रोच्चाराने भारित
आम्ही आरत्या म्हणू लागलो
पण मंत्रोच्चार म्हणणारी व्यक्ती ओळखली नाही त्वरित
आज उसासे टाकून उपयोग नाही 
कधी कळणार? जेंव्हाच्या तेंव्हाच करायच्या असतात अनेक गोष्टी
कुणाचे आभार, कुणाचे अभिनंदन, कुणाचे कौतुक, कुणाला नमस्कार आणि अट्टाहास सर्वांसाठी
बाबांना कितीतरी पेपर्स नेहमीच तपासावे लागायचे
मान तुटून पडायची वेळ यायचीl अंग दुखायचे 
पण कधीच म्हंटले नाही, म्हणावे असे कधी कळलेच नाही की मी करु का काही मदत म्हणून
बाकीही सर्व जबाबदारी ते पेलतच राहिले आणि आम्हाला कधी आकळलेच नाही
आई कष्ट उपसतच होतीl आयते ताट आमच्यासमोर ठेवत होतीl तिच्यासारखे व्हावे; वाटलेच नाही कधी
फळझाडे फळे, आणि फुलवेली फुले देतच राहिली 
किती देणे त्यांचेl काय घ्यायचे त्यांच्या या कृतीतून
कळलेच नाही कधी
कितीतरी प्रेमाच्या व्यक्ती आयुष्यातून अंतर्धान पावल्याl त्यांचे आत्मतेज कळलेच नाही कधी
जिंदगीके सफर में गुजर जाते है जो मकामl वो फिर नहीं आतेl वो फिर नहीं आते
म्हणतातच ना शायर, मग आता उसासे टाकण्यात अर्थ नाही 
वेळीच जीवनाचा अर्थ आकळा
व्हा Umpire जिंका Empire
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment