Sunday, 14 February 2016

पाठपुरावा

पराभव माणसाला नकोच असतो पण आईवडिलांना मुलांनी केलेल्या पराभवात आनंद असतो. -या गुरुलाही शिष्याने मात केली तर धन्यता वाटते. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद आहे उत्तम याचे उदाहरण. दोघेही एकमेकांचा शोध घेत होते. रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या सर्व आध्यात्मिक तेजाचे विवेकानंदात केले अभिसरण. उत्तराधिकारी हवा असतो वारस म्हणून. मठ चालावा ही गुरुची इच्छा, वंश चालावा ही आईवडिलांची इच्छा. दोघांवरही असते खूपच कठीण जबाबदारी
नाहीतर निघेल दिवाळखोरी
सर्व राखायचे तर आचरण हवे शुध्द 
नाहीतर कपिलवस्तुतून निघून जाईल बुध्द
विवेकानंद तर झाले, शिकागोला जाऊन, भारतीय तत्वज्ञानाचा पुरस्कार करुन
प्रसिध्द आणि अजरामर; तर तो समजायचा का रामकृष्ण परमहंसांचा पराजय? की विजयस्वर
मुलांच्या वैभवात, सामर्थ्यात आईवडिलांचा नसतो कधीच पराजय
त्यासाठीच तर त्यांनी पायवा पक्का केला असतो
मुलगा व्हावा अमर आणि अजय
इमारत एकदम तयार होत नाही, पायव्याचे दगड हवे मजबूत
कळस नजरेत भरत नाही जर 
पायवा नसेल शाबूत
म्हणून पाठपुरावा करा आधीच्या पिढ्यांचा आणि उंच लावा झेंडा अत्त्युत्तमाचा.


     संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment